Manvi Mutri Kartana bheemgeet presented by T-Series, sung by Milind Shinde,

Lyrics: Manvi Mutri Kartana (मानवी मूर्ती करताना)

मानवी मूर्ती करताना,
मूर्ती वर प्रित करताना,
मी पाहिला कुंभार मातीत जीव भरताना,
मानवी मूर्ती करताना..काय सांगू कोणाला,
कुंभार तो कसला…2
साक्षात डोळ्यांनी,
गौतम मला दिसला…2
दिसला मला त्या गौतमाचा मार्ग धरताना…2
मानवी मूर्ती करताना,
मूर्ती वर प्रित करताना,
मी पाहिला कुंभार मातीत जीव भरताना,
मानवी मूर्ती करताना…।।1।।कानात भीमवानी,
फुंकीत ही होता…2
वरतून बौध्दामृत,
शिंपीत ही होता…2
तो धुंद होता मूर्तीवरुनी हात फीरवताना…2
मानवी मूर्ती करताना,
मूर्ती वर प्रित करताना,
मी पाहिला कुंभार मातीत जीव भरताना,
मानवी मूर्ती करताना…।।2।।भगवंत भीम होता
कोणी म्हणो काही…2
घडले मला दर्शन,
ही पूर्व पुन्यायी…2
स्मरणार्थ ठेवीन मूर्तीकारा खास मरताना…2
मानवी मूर्ती करताना,
मूर्ती वर प्रित करताना,
मी पाहिला कुंभार मातीत जीव भरताना,
मानवी मूर्ती करताना…।।3।।

तो आठविता क्षण,
आधिर होते मन…2
त्या चरणी नागेशा,
मन घेते लोटांगण…2
निर्जीव होतो देह येथे भान हरताना…2
मानवी मूर्ती करताना,
मूर्ती वर प्रित करताना,
मी पाहिला कुंभार मातीत जीव भरताना,
मानवी मूर्ती करताना…।।4।।

मानवी मूर्ती करताना,
मूर्ती वर प्रित करताना,
मी पाहिला कुंभार,
मातीत जीव भरताना,
मानवी मूर्ती करताना…..

……………

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.
New bheemgeet
Top 3 bheemgeet