Majha Je Je Kahi Sari Bhimachi Punyai bheemgeet by Shital Sathe, Composed by Aniket Mohite and lyrics by Sachin Mali. Presented by Navayan Mahajalsa

Lyrics: Bhimachi Punyai (भिमाची पुण्याई)

डोळां सपान लिहून ओवी गातीया ग माई
डोळां सपान लिहून ओवी गातीया ग माई
माझ जे जे काही सारी भीमाची पुण्याई

माझ जे जे काही सारी भीमाची पुण्याई…2

ज्ञान बंदीचा हुकुम होता माय बापड्याला,
होता माय बापड्याला…2
बांधल सूर्याच तोरण त्यान माझ्या झोपड्याला
त्यान माझ्या झोपड्याला…2
फिटला युगाचा अंधार…2
सूर्य दिसला ग बाई,
माझ जे जे काही सारी भीमाची पुण्याई,
माझ जे जे काही सारी भीमाची पुण्याई…।।1।।

सोडा जोहार, जोहार….
आम्हा माणसावानी वागवा,
मानवतेची ज्योत तुमच्या…
ह्रिदयातून जागवा,
धर्म माणूसकीचा भीमा शरण बुद्धाला ग जाई,
शरण बुद्धाला ग जाई,
धम्म देई भीम शरण बुद्धाला ग जाई…2
माझ जे जे काही सारी भीमाची पुण्याई,
माझ जे जे काही सारी भीमाची पुण्याई…।।2।।

भाकरी आधी स्वाभिमान पाहिजे माणसाला मान,
पाहिजे माणसाला मान…2
कसल्या गावाच्या जमीन पाहिजे हक्काच व रान,
पाहिजे हक्काच व रान…2
बंध मुक्ती साठी वस्त्या जागल्या ग बाई…2
माझ जे जे काही सारी भीमाची पुण्याई,
माझ जे जे काही सारी भीमाची पुण्याई…।।3।।

जुल्मी या डोलाऱ्याचं…
ग्रीहन सुटणार कधी,
चोख्याच्या पायरीचा…
पांघ फीटणार कधी,
बेड्या हजारो सालांच्या खणाणल्या ग बाई,
बेड्या खणाणल्या बाई..
बेड्या हजारो सालांच्या खणाणल्या बाई…2
माझ जे जे काही सारी भीमाची पुण्याई,
माझ जे जे काही सारी भीमाची पुण्याई…।।4।।

माझ जे जे काही सारी भीमाची पुण्याई….
माझ जे जे काही सारी भीमाची पुण्याई…

………………….

भीमाची पुण्याई…| शितल साठे | सचिन माळी | Navayan Mahajalsa

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.
New bheemgeet
Top 3 bheemgeet