Bhim Jayantila bheemgeet by Vibhavari Satardekar, Composed by Santosh Vishwikar and lyrics by Vijay Gawai

Lyrics: Bhim Jayantila (भीम जयंतीला)

भीम जयंतीला जाते बाई मी भीम वाडी…2
आली न्यावयाला मला घुंगराची गाडी…2

 

भीम जयंतीला जाते बाई मी भीम वाडी…2
आली न्यावयाला मला  घुंगराची गाडी…2
जाऊ कधी माहेरी लागली ग ओढ,
आतुरलेल्या मना झाल गगन ही थोड…2
घनदाट वस्ती तिथ चहूड आंब्याची झाडी…2
आली न्यावयाला मला घुंगराची गाडी…।।1।।

 

सोबतीला माझ्या येतो डोलदार पाट,
राख तोरणमाळ त्याच निराळाच थाट…2
नागमोडी वाट जाती ऊभी चिरुनी पहाडी…2
आली न्यावयाला मला घुंगराची गाडी…।।2।।

 

बुद्ध पहाटे सारी निळ्या झेंड्याखाली,
ओढीनं भीमरथाना ही उतावळी झाली…2
निळा निळा टिळा भाळी लेउनी शुभ्र ती साडी…2
आली न्यावयाला मला घुंगराची गाडी…।।3।।

 

जय भीम घोष दुम दुमतो गावो गाव,
भिमापुढे नमती माझ्या रंक आणि राव…2
समता सैनिक दल तेथे फिरवितो काढी…2
आली न्यावयाला मला  घुंगराची गाडी…।।4।।

 

लाजली दिवाळी घरोघरी रोषणाई,
लखलखती पहा जिथेही नजर जाई…2
दुरूनच दिसे ती बंधू विजयांची माडी…2
आली न्यावयाला मला  घुंगराची गाडी…।।5।।

 

भीम जयंतीला जाते बाई मी भीम वाडी…2
आली न्यावयाला मला  घुंगराची गाडी…..

 

………………….

भीम जयंतीला…| विजय गवई | विभावरी सातर्डेकर | संतोष विश्विकर

 

2 comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.
New bheemgeet
Top 3 bheemgeet