Bhartacha Ghatankar Jhala Majha Bhimaraya the song by Vaibhav Khune And DJ Nildhwaj

Lyrics: Bhartacha Ghatankar Jhala Majha Bhimaraya (भारताचा घटनाकार झाला माझा भिमराया)

भिमाईचा तो बाळ भीमराया,
बहुजनांची… आई,
लिहूनीया देशाची घटना,
अहो केली जगी नवलाई….
जिद्द शिक्षणाची उरी,
होती गरीबी ती घरी,
मन लावून शिकला तरी,
नाही चुकला शाळेत जाया,
भारताचा घटनाकार झाला माझा भिमराया…2
सुभेदार रामजीच पोर,
भलताच बुध्दीन हुशार…2
जरी होता वर्गाच्या बाहेर,
धडा धडा द्यायचा उत्तर…2
त्या कपटी मास्तरान,
जाती भेदाला मानून,
पोर म्हाराच माणुन बंदी घातली आत याया
भारताचा घटनाकार झाला माझा भिमराया…।।1।।
भीमान आम्हाला घडविल,
जिवन सोन्यान मडविल…2
गुलामी मधुन सोडविल,
काळ्या मनूला रडविल…2
जावा दिव्याखाली बसून,
केला आभ्यास कसुन,
जाती टाकून पुसून हिंदुस्थानला ताराया
भारताचा घटनाकार झाला माझा भिमराया…।।2।।
भिम बहुजनाचा पिता,
लाखात भिमराव होता…2
त्यालाच लेकरांची चिंता, सोडविला जातीचा तो गुंता…2
त्या राजेश बंधुंन आणि शाहीर नंदुन,
भीम बुध्दांशी वंदून लागे धम्मगीत गाया
भारताचा घटनाकार झाला माझा भिमराया…।।3।।
जिद्द शिक्षणाची उरी,
होती गरीबी ती घरी,
मन लावून शिकला तरी,
नाही चुकला शाळेत जाया,
Bhartacha Ghatankar …. Jhala Majha Bhimaraya…..

………..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.
New bheemgeet
Top 3 bheemgeet