Ashikshit Jaroor Mee bheemgeet presented by T-Series,  sung by Anand Shinde,

Lyrics: Barrister Saheb Majha (बँरिस्टर साहेब माझं)

अशिक्षित जरुर मी,
लेखू नको मज कमी…2
परीचय स्वतः चा.. देते परीचय स्वतः चा…
माझ नाव हाय रमाई,
धनी पिता भारताचा…2

पतीव्रतेचा दाखला माझा,
या जन्मीचा सोबती राजा…2
धनी मला साजतो,
दाही दिशा गाजतो…2
डंका तो किर्तीचा..त्याच्या डंका तो किर्तीचा,
माझ नाव हाय रमाई,
धनी पिता भारताचा…।।1।।

या देशाचा नेक हा नेता,
बोद्ध जनांचा जीवन दाता..2
पीडित आज मानवा,
ज्ञानाचा देऊन दीवा…2
मार्ग नव हिताचा..तो मार्ग नव हिताचा,
माझ नाव हाय रमाई,
धनी पिता भारताचा…।।2।।

या पोलादी झुंजाराची,
आहे मी पत्नी धुरंदराची…2
ना कुणी या सारख
जनहिताचा म्होरका…2
सारथी रथाचा..तो सारथी रथाचा,
माझ नाव हाय रमाई,
धनी पिता भारताचा…।।3।।

अशिक्षित जरुर मी,
लेखू नको मज कमी…2
परीचय स्वतः चा.. देते परीचय स्वतःचा.
माझ नाव हाय रमाई
धनी पिता भारताचा

……………

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.




New bheemgeet




Top 3 bheemgeet